www.24taas.com, इस्लामाबाद
भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने डबल्समध्ये पाकिस्तानी जोडीदाराबरोबर खेळण्यास साफ नकार दिलाय. इंटरनॅशनल टूर्नामेंटमध्ये पाकिस्तानचा टेनिस स्टार ऐहसाम उल हक कुरैशी नव्हे तर भारताचा महेश भूपतिबरोबरच आपण डबल्समध्ये कोर्टवर उतरू, असं सानियाने स्पष्ट केलंय. आपण पाकिस्तानी प्लेअर्सबरोबर विवाह केला असला तरी कोर्टावर पाकिस्तानी प्लेअर्सबरोबर खेळलं पाहिजे असं नव्हे असं सानियाचं म्हणणं आहे.
सानिया व शोएब मलिक यांचा निकाह झाल्यापासून सानिया आता भारतीय राहिली नसल्याचा बराच आरडा ओरडा झाला होता. सानिया विवाहानंतर पाकिस्तानात गेल्यामुळे भारतात तिच्याबद्दल नाराजीचा सूर होता. मात्र तरीही ती टेनिस खेळताना आजही भारतातर्फेच खेळते.
यापूर्वी दुहेरीत कॅलिफोनिर्यात स्टँडफोर्ड स्पर्धेत सानिया दुहेरीत इस्त्रायलच्या शाहर पीरच्या साथीने उतरली होती. तेव्हा मुस्लिम समाजात तिच्याविरुद्ध संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.