www.24taas.com, नवी दिल्ली
भारताची बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल हिला आशिया चॅम्पियनशिप स्पर्धेत पराभवाचा धक्का बसला. .
सायनाला उप - उपांत्यपूर्व फेरीतच पराभव पत्करावा लागला. चीनच्या चेन झिआवो जिया हिने साईनावर २१-१३, २१-१३ अशी मात केली .क्विंगदावो , चीन येथे ही स्पर्धा सुरू आहे . या स्पर्धेत साईनाला पाचवे , तर जियाला ४०वे मानांकन आहे . या दोन्ही प्रमथम आमनेसामने आल्या होत्या . मात्र , साईनाला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही . जियाने तिचे आव्हान ४४ मिनिटांतच परतवून लावले .
सायनाबरोबर साई प्रणीत , प्रज्ञा गद्रे - प्राजक्ता सावंत , व्ही . दिजू - ज्वाला गुट्टा , अक्षय देवलकर - प्रज्ञा गद्रे यांचेही आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे आशियाई स्पर्धेत पदकाची आशा आता मावळली आहे.
संबंधित बातमी