भारताला सॅफ चॅम्पियनशीपचे विजेतेपद

नवी दिल्ली इथे सुरु असलेल्या नवव्या सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिपचे विजेतेपद भारताने पटकावलं आहे. भारताने अंतिम सामन्यात अफगाणीस्तानवर ४-० असा दणदणीत विजय मिळवला. सॅफ चॅम्पियनशिपमधील भारताचे हे सहावे विजेतेपद आहे.

Updated: Dec 11, 2011, 02:56 PM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

नवी दिल्ली इथे सुरु असलेल्या नवव्या सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिपचे विजेतेपद भारताने पटकावलं आहे. भारताने अंतिम सामन्यात अफगाणीस्तानवर ४-० असा दणदणीत विजय मिळवला. सॅफ चॅम्पियनशिपमधील भारताचे हे सहावे विजेतेपद आहे.

यापूर्वी भारताने १९९३, १९९७, १९९९, २००५ आणि २००९ मध्ये विजेतेपद पटकावलं होतं. मॅचच्या पहिल्या हाफमध्ये भारत आणि अफगाणीस्तानकडून एकही गोलची नोंद झाली नाही. मात्र दुसऱ्या हाफच्या अखेरीस भारताने चार गोल करत विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. मणिपूरच्या सुशिलकुमारने सिंगने भारतासाठी अखेरचा आणि चौथा गोल केला.