ठाणे एथेलेटिक निवडणूक, आव्हाड चीत

ठाणे जिल्हा एथेलेटिक असोसिएशनची निवडणूकीत एकनाथ शिंदे यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारली. त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा पराभव केला. १६५ मतांपैकी शिंदे यांना १०६ तर जितेंद्र आव्हाड यांना ५९ मते मिळाली. राजकीय नेत्यांनी या निवडणूकीत सहभाग घेतल्यानं रंगत आली.

Updated: Nov 14, 2011, 10:57 AM IST

झी २४ तास वेब टीम, ठाणे

 

ठाणे जिल्हा एथेलेटिक असोसिएशनची निवडणूकीत एकनाथ शिंदे यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारली. त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा पराभव केला. १६५ मतांपैकी शिंदे यांना १०६ तर जितेंद्र आव्हाड यांना ५९ मते मिळाली. राजकीय नेत्यांनी या निवडणूकीत सहभाग घेतल्यानं रंगत आली.

 

या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना आमदार एकनाथ शिंदे आमनेसामने होते. या दोन्ही तगड्या उमेदवारांमुळे ही निवडणूक कमालीची रंगतदार झाली. या निवडणुकीसाठी एकूण अडीचशे मतदार होते. महापालिका निवडणुकांची धामधूम सुरू होण्याआधीच या निवडणुकीत मिळवलेला विजय आमदार एकनाथ शिंदे यांचा उत्साह वाढवणारा ठरणार आहे.