उत्सुकता लंडन ऑलिम्पिकच्या उद्घाटनाची

लंडननगरी ऑलिम्पिकसाठी सज्ज झालीय. ३० व्या ऑलिम्पिक खेळांना आजपासून लंडनमध्ये सुरुवात होतेय. भारतीय वेळेनुसार रात्री दीड वाजता या सोहळ्याला सुरुवात होणार आहे आणि तो पहाटेपर्यंत सुरू असेल. आता साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत त्या लंडन ऑलिम्पिकच्या रंगतदार ओपनिंग सेरेमनीवर...

Updated: Jul 27, 2012, 09:54 AM IST

www.24taas.com, लंडन

लंडननगरी ऑलिम्पिकसाठी सज्ज झालीय. ३० व्या ऑलिम्पिक खेळांना आजपासून लंडनमध्ये सुरुवात होतेय. भारतीय वेळेनुसार रात्री दीड वाजता या सोहळ्याला सुरुवात होणार आहे आणि तो पहाटेपर्यंत सुरू असेल. आता साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत त्या लंडन ऑलिम्पिकच्या रंगतदार ओपनिंग सेरेमनीवर... दरम्यान, बीजिंग ऑलिम्पिकपेक्षाही लंडन ऑलिम्पिकचा ओपनिंग सोहळा रंगतदार होणार का याचीच उत्सुकता साऱ्यांना लागलीय.

 

लंडन बीजिंगला मात देणार का?... कसा असेल लंडनमधला ऑलिम्पिकचा सोहळा... चार वर्षांपूर्वी बीजिंग ऑलिम्पिकच्या यशस्वी आयोजनानंतर जेव्हा लंडनकडे ऑलिम्पिक ज्योत सुपूर्द करण्यात आली, त्याचवेळी २०१२ लंडनसमोर बीजिंग ऑलिम्पिकच्या ओपनिंग सेरेमनीला मात देण्याच आव्हान उभं ठाकलं होतं. आता चार वर्षांनंतर लंडन ओपनिंग सेरेमनीसाठी सज्ज झालंय.

 

चार वर्षांपूर्वीच्या बीजिंगमध्ये आणि आजच्या लंडनमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. ओपनिंग सेरेमनीसाठी बीजिंगकडे ‘बर्डनेस्ट स्टेडियम’ होत तर लंडनकडे ‘ऑलिम्पिक पार्क’ आहे. बीजिंगच्या ओपनिंग सेरेमनीची सगळी जबाबदारी चीनचा फिल्ममेकर जँग येमू याच्याकडे होती तर लंडन ड्रीम्सला साकार करण्याची जबाबदारी ऑस्कर विनिंग डायरेक्टर डॅनी बॉयल याच्या खांद्यावर आहे. दरम्यान, ओपनिंग सेरेमनीमध्ये परफॉर्म करणाऱ्या कलाकारांची संख्या तेवढीच आहे. बीजिंगमध्येही जवळपास १५ हजार कलाकारांनी आपल्या कलेचं दर्शन घडवल होतं आणि लंडनमध्येही जवळपास १५ हजार कलाकार आपल्या कलेच दर्शन घडवतील.

 

दरम्यान, बीजिंग ऑलिम्पिकच्या धरतीवर लंडन ऑलिम्पिक सेरेमनीचा कालावधी हा कमी असणार आहे. बीजिंग ऑलिम्पिकचा ओपनिंग सेरेमनी हा जवळपास चार तास सुरू होता तर लंडन ऑलिम्पिक सेरेमनी अडीच तास चालण्याची शक्यता आहे. बीजिंग ऑलिम्पिक सेरेमनीमध्ये १०० मीलियन यूएस डॉलरचा खर्च आला होता तर लंडन ऑलिम्पिकच्या सेरेमनीसाठी ४१ मीलियन पाऊंड खर्च येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

.