स्तनपान करतं कँसरपासून बचाव

स्तनपानाचे अनेक फायदे आहेत, असं अनेक डॉक्टर सांगत असतात. स्तनपान करवल्याने बाळ कँसर सारख्या प्राणघातक आजारापासून सुरक्षित रहातं. नव्या संशोधनातून असं समोर आलं आहे, की आईच्या दुधामुळे कँसरशी लढण्याची शक्ती मिळते. प्रतिकार क्षमता वाढते.

Updated: May 1, 2012, 12:33 PM IST

www.24taas.com, लंडन

 

स्तनपानाचे अनेक फायदे आहेत, असं अनेक डॉक्टर सांगत असतात. स्तनपानाचा आणखीही एक फायदा आहे. स्तनपान करवल्याने बाळ कँसर सारख्या प्राणघातक आजारापासून सुरक्षित रहातं. नव्या संशोधनातून असं समोर आलं आहे, की आईच्या दुधामुळे कँसरशी लढण्याची शक्ती मिळते. प्रतिकार क्षमता वाढते.

 

कँसरचा प्रतिकार करण्यासाठी आवश्यक असणारे टीएनएफसंबंधी एपोपटोसिस इंड्यूसिंग लिगांड आईच्या दुधातून प्राप्त होत असतं. शास्त्रज्ञांचं संशोधन सांगतं की मानवी दुधात कँसरशी लढण्याची जबरदस्त शक्ती असते.

 

एसएजीई पत्रिकेने प्रकाशित केलेल्या जर्नल ऑफ ह्युमन लॅक्टेशनमध्ये असं लिहीण्यात आलंय की प्रसुतीनंतरचं पहिलं दूध आणि नव्याने आई बनलेल्या महिलांचं परिपक्व दुधाच्या नमुन्यांचं परीक्षण केलं गेलं. यातून असं सिद्ध झालं की हे दूध बालकांना कँसरशी लढम्याची शक्ती देतं.