दातांचा एक्स-रे वाढवतो कँसरचा धोका

वारंवार दातांचा एक्स-रे काढल्यास मेंदूचा कँसर होण्याचा धोका दुप्पट वाढतो, असं एका शोधातून समोर आलं आहे. यासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून असा निष्कर्ष काढण्यात आला आहे, की दातांचा एक्स-रे शक्यतो काढू नये. किंवा एक- दोनदाच काढावा.

Updated: Apr 11, 2012, 10:01 AM IST

www.24taas.com, वॉशिंग्टन

वारंवार दातांचा एक्स-रे काढल्यास मेंदूचा कँसर होण्याचा धोका दुप्पट वाढतो, असं एका शोधातून समोर आलं आहे. यासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून असा निष्कर्ष काढण्यात आला आहे, की दातांचा एक्स-रे शक्यतो काढू नये. किंवा एक- दोनदाच काढावा.

अमेरिकेच्या येल युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी हे सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणातून असं समोर आलं आहे की एका वर्षात एकाहून अधिक वेळा दातांचा एक्स-रे काढल्यास मेंदूचा कँसर होण्याची शक्यता दुपटीने वाढते.

या एक्स-रेमुळे ट्युमर मेनिनजियोमा हा मेंदूचा कँसर होण्याची शक्यता १.४ ते १.९ पट वाढते. हे संशोधनातून समोर आलं आहे. ज्या लोकांनी वयाच्या दहाव्या वर्षापासून आपल्या दातांचे एक्स-रे काढले आहेत, त्या लोकांमध्ये मेनिनजियोमा होण्याचा धोका ४.९ पटीने वाढतो, असंही या संशोधनातून सिध्द झालं आहे.