तमिळनाडू सरकार वाटणार सॅनिटरी नॅपकीन्स

तमिळनाडुच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी राज्यातील सात लाख मुली आणि महिलांसाठी मोफत सॅनिटरी नॅपकीन देण्याच्या योजनेला प्रारंभ केला.

Updated: Mar 29, 2012, 07:09 PM IST

www.24taas.com, चेन्नई

 

तमिळनाडुच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी राज्यातील सात लाख मुली आणि महिलांसाठी मोफत सॅनिटरी नॅपकीन देण्याच्या योजनेला प्रारंभ केला.

 

देशभरातला अशा स्वरुपाचा हा पहिलाच उपक्रम आहे आणि त्यासाठी ४४.२१ कोटी रुपये खर्च येणार आहे. तमिळनाडू सरकार शाळेत शिकणाऱ्या मुलींना, महिला कैद्यांना आणि मातांना मोफत सॅनिटरी नॅपकीन वाटणार आहे. जयललिता यांनी आज योजनेचा प्रारंभ करताना सचिवालयात सात महिलांना सॅनिटरी नॅपकीन दिले असं प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

 

तमिळनाडूला अनेक कल्याणकारी योजनांची परंपरा आहे. एम.जी.रामचंद्रन यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत राज्यातील गरिबांसाठी अनेक योजना राबवण्यात आल्या होत्या. त्यामुळेच रामचंद्रन यांची कारकिर्द दीर्घकाळ लोकांच्या स्मरणात राहील. जयललिता या रामचंद्रन यांच्या राजकीय वारसदार आहेत आणि त्या त्यांचाच वारसा पुढे चालवत आहेत.