सावधान, सोमवारी नेट बंद! फेसबुकची सूचना

अमेरिकेत इंटरनेटची काही समस्या उद्भवल्याने इंटरनेट बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन फेसबूक आणि गुगलसारख्या वेबसाईटने एक सूचना दिलेली आहे.

Updated: Jul 7, 2012, 08:25 AM IST

www.24taas.com, न्युयॉर्क

 

अमेरिकेत इंटरनेटची काही समस्या उद्भवल्याने इंटरनेट बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन फेसबूक आणि गुगलसारख्या वेबसाईटने एक सूचना दिलेली आहे. कारण की, सोमवारी मालवेअर (व्हायरस) आपला इंटरनेट पूर्णपणे बंद करू शकेल.

 

त्यामुळे तुमची इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे.  इंटरनेट सेवा प्रदान करणाऱ्या कंपन्यांनी एक सूचना जाहीर केली आहे. तर एफबीआयने मालवेअरपासून इंटरनेटच्या सुरक्षेसाठी एक विशेष वेबसाईट तयार केलेली आहे. त्यामुळे एफबीआयला इंटरनेट सेवा खंडीत होणार नाही अशी आशा आहे. परंतु सायबर सुरक्षा मोठ्या प्रमाणात असली तरीही जगभरातील हजारो लोकांना या मालवेअर व्हायरसमुळे त्रास होण्याची शक्यता आहे.

 

मालवेअर हॅकर्सच्या समूहांकडून हा व्हायरस पाठविण्यात येत आहे. एफबीआयने तयार केलेल्या वेबसाईटद्वारे ते या व्हायरसवर नजर ठेवणार आहे. मात्र आपला इंटरनेट बंद होण्याची दाट शक्यता आहे.