'गॉड पार्टिकल'चं भारताशी नातं

ब्रह्मांड उत्पत्तीचं रहस्य सांगणारा अणू मिळाल्याचा शास्त्रज्ञांनी दावा केल्यामुळे सगळ्यांची हिग्स बोसोन या अणूबद्दल सगळ्यांचीच उत्सुकता वाढली आहे.

Updated: Jul 5, 2012, 02:02 PM IST

www.24taas.com, जेनिव्हा

 

ब्रह्मांड उत्पत्तीचं रहस्य सांगणारा अणू मिळाल्याचा शास्त्रज्ञांनी दावा केल्यामुळे सगळ्यांची हिग्स बोसोन या अणूबद्दल सगळ्यांचीच उत्सुकता वाढली आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का, की या संशोधनात भारताचाही मोठा वाटा आहे.

 

या अणूचा भारताशी जवळचा संबंध आहे. या अणूला नावदेखील भारतीय शास्त्रज्ञाच्याच नावावरून दिलेलं आहे. आणि या संशोधनात महत्वाचं नाव आहे भारतीय शास्त्रज्ञ सत्येंद्र नाथ बोस यांचं. बोस यांच्याच नावावरून हिग्स बोसेन हे नाव मिळालं. ब्रिटीश संशोधक पीटर हिग्स आणि भारतीय सत्येंद्र नाथ बोस यांच्या नावावरून हिग्स बोसेन हे नाव या शक्तीशाली अणूला देण्यात आलं.

 

स्विट्झरलंडच्या सर्नमधील शास्त्रज्ञांनी या गॉड पार्टिकलवर ५० वर्षं संशोधन केलं. याच प्रकारच्या अणूपासून महाविस्फोट होऊन १३.७ अब्ज वरषांपूर्वी विश्वाची निर्मिती झाली. सर्न या संस्थेशी जवळपास दहा भारतीय संस्था जोडल्या गेल्या आहेत. ज्यात अलीगढ़ मुस्लिम विश्वविद्यालय, जम्मू विश्वविद्यालय, भुवनेश्वरमधील इंस्टीट्यूट ऑफ फिजिक्स, पंजाब विश्वविद्यालय, गुवाहाटी विश्वविद्यालय आणि राजस्थान तथा कोलकातास्थित साहा इंस्टीट्यूट ऑफ न्यूक्लियर फिजिक्स, व्हेरिएबल एनर्जी साइक्लोट्रान सेंटर, बोस इंस्टीट्यूट आणि आईआईटी मुम्बई या संस्थांचा समावेश आहे.