नवी कार आली, ड्रायव्हरशिवाय चालणारी..

गाडी म्हंटलं की, ड्रायव्हर हा आलाच, पण आता मात्र तुम्हांला अशी कार मिळणार आहे, ज्याला ड्रायव्हरची अजिबात गरज लागणार नाही. काय खरं वाटत नाही ना, हो पण अशी कार अस्तिवात आहे.

Updated: May 10, 2012, 10:59 AM IST

www.24taas.com, नेवाडा 


गाडी म्हंटलं की, ड्रायव्हर हा आलाच, पण आता मात्र तुम्हांला अशी कार मिळणार आहे, ज्याला ड्रायव्हरची अजिबात गरज लागणार नाही. काय खरं वाटत नाही ना, हो पण अशी कार अस्तिवात आहे. अमेरिकेतील नेवाडा शहरात ड्रायव्हरशिवाय चालणारी कार रस्त्यावर आणण्यास तेथील सरकारने मंजुरी दिलेली आहे. ड्रायव्हरशिवाय कार रस्त्यावर नेण्याचा पहिला बहुमान टोयोटा परायस या कारला मिळाला आहे. सर्च इंजिन तयार करणारी गुगल कंपनी या कार मॉडेलवर काम करीत आहे.

 

टोयोटा परायस या कारमध्ये गुगलने काही बदल केले आहेत. या कारच्या छतावर बसविलेले व्हिडीओ कॅमेरे, सेन्सर आणि लेसर किरणाद्वारे या कारचे नियंत्रण केले जाते. गुगलच्या इंजिनीअर्सनी कॅलीफोर्नियाच्या रस्त्यावर ही कार चालविली. याखेरीज सॅनफ्रान्सिस्को येथील गोल्डन गेट पुलावरून ही कार धावली आहे.

 

या कारची चाचणी घेताना प्रशिक्षित चालकांनी तिचे निरीक्षण केले. कारमधील सॉफ्टवेअर फेल झाल्यावर कारचे नियंत्रण चालक करीत होते. ही कार एक लाख ४० हजार मैल इतके अंतर कोणत्याही दुर्घटनेशिवाय धावू शकते. नेवाडा येथील मोटार वाहन विभागाचे संचालक ब्रूस ब्रेस्लो यांना भविष्यात विनाचालक कारचा जमाना येईल असे वाटते.