परदेशी भाषेतील ई-मेल तुमच्या भाषेत

आता तुम्हाला स्व:ताच्या भाषेत (जी तुम्हाला भाषा येते, त्या भाषेत) ई - मेलवर तुम्हाला भाषांतरीत करता येतील , अशी सोय आता जीमेल उपलब्ध करून देण्यात येणार आहे . तुमच्या या आजवरच्या अडचणींवर जीमेलने हा शोधलेला उत्तम पर्याय आहे, हे नक्की.

Updated: May 3, 2012, 01:08 PM IST

www.24taas.com, हैदराबाद

 

इंटरनेटच्या जगात ई-मेलचे महत्व वाढले आहे. कारण  ई - मेलच्या माध्यमातून संवाद साधणे सोपे झाले आहे. आता तुम्हाला स्व:ताच्या भाषेत (जी तुम्हाला भाषा येते, त्या भाषेत) ई - मेलवर तुम्हाला भाषांतरीत करता येतील , अशी सोय आता जीमेल उपलब्ध करून देण्यात येणार आहे . तुमच्या या आजवरच्या अडचणींवर जीमेलने हा शोधलेला उत्तम पर्याय  आहे, हे नक्की.

 

 

जीमेल येत्या काही दिवसांच्या कालावधीमध्ये प्रत्येकाच्या ई - मेल सेंटिंगमध्ये हा पर्याय उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे  संबंधित मजकूर भाषांतरीत करण्यासाठी तुम्ही या उपलब्ध पर्यायावर क्लिक करताच संबंधित मजकूर तुमच्या भाषेत उपलब्ध होऊ शकेल . गुगलने यापूर्वी जीमेल लॅब्सवर हा पर्याय उपलब्ध करून दिला होता . त्यानंतर त्याबाबत सर्वेक्षण करण्यात आले . या सर्वेक्षणात मजकुराच्या भाषांतराच्या आवश्यकता आणि मागणी लक्षात आल्याने हा पर्याय उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे गूगल ट्रान्सलेटचे प्रोडक्ट मॅनेजर जेफ चिन यांनी सांगितले .