'द न्यू यॉर्क टाईम्स'चा 'इ-मेल' घोटाळा

प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्र ‘न्यू यॉर्क टाईम्स’च्या ८० लाख वर्गणीदारांना गुरूवारी अचानक ‘न्यू यॉर्क टाईम्स’ची वर्गणी रद्द करण्याचा बेत रद्द केल्यास आम्ही तुम्हाला डिस्काऊंट देऊ’ असं सांगणारा ‘न्यू यॉर्क टाईम्स’चा इ-मेल आला.

Updated: Dec 29, 2011, 02:14 PM IST

झी २४ ास वेब टीम, न्यू यॉर्क

 

प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्र ‘न्यू यॉर्क टाईम्स’च्या ८० लाख वर्गणीदारांना गुरूवारी अचानक ‘न्यू यॉर्क टाईम्स’ची वर्गणी रद्द करण्याचा बेत रद्द केल्यास आम्ही तुम्हाला डिस्काऊंट देऊ’ असं सांगणारा ‘न्यू यॉर्क टाईम्स’चा इ-मेल आला. आणि त्याने सगळाच गोंधळ झाला. डिस्काऊंटच्या आशेने जवळपास कुठल्याच वर्गणीदाराने ‘न्यू यॉर्क टाईम्स’ची वर्गणी रद्द केली नाही.

 

न्यू यॉर्क टाईम्समच्या मते ही माणसाकडून झालेली चूक आहे. खरंतर हा इ-मेल घरी येणाऱ्या न्यू यॉर्क टाईम्सची वर्गणी रद्द करू पाहाणाऱ्या ३०० ते ४०० वर्गणीदारांना पाठवायचा होता. प्रत्यक्षात मात्र हा मेल एकदम ८० लाख लोकांना पाठवला गेला.

 

सुरूवातीला बऱ्याच वर्गणीदारांना वाटलं की न्यू यॉर्क टाईम्सची मेल सिस्टम हॅक झाली असवी. या संदर्भात अनेकांनी फेसबुक आणि ट्विटरवर आपली चिंता व्यक्त केली. पण, पण, आय टी सुरक्षेत कुठलीही गडबड नसल्याचा निर्वाळा न्यू यॉर्क टाईम्सच्या प्रवक्त्याने

दिला आहे.

 

 

“आज ‘द न्यू यॉर्क टाईम्स’कडून सुरूवातीला पाठवला गेलेला इ-मेल हा चुकून पाठवला गेला होता. हा इ-मेल काही मोजक्याच वर्गणीदारांना पाठवायचा होता. मात्र, चुकून तो मोठ्या प्रमाणावर पाठवला गेला. यापूर्वी ज्या लोकांचे इ-मेल आयडी आमच्या लिस्टमध्ये होते, त्या सगळ्यांना चुकून मेल पाठवला गेला.” असं स्पष्टीकरण द न्यू यॉर्क टाईम्स या वर्तमान पत्राच्या प्रवक्त्याने दिलं.

 

१६ आठवडे द न्यू यॉर्क टाईम्सचा अंक घरपोच मागवल्यास ५० %  डिस्काऊंट मिळेल अशा आशयाचा हा मेल होता. द न्यू यॉर्क टाईम्स हे वर्तमान पत्र न्यू यॉर्क टाईम्स कं. च्या मालकीचं आहे.