झी २४ तास वेब टीम, मुबई
ब्लॅकबेरी सिरीज फोनचे निर्माते रिसर्च इन मोशन म्हणजे रिमने प्लेबुकची किंमत निम्म्याहून कमी केली आहे. भारतात टॅबलेट पीसीला असलेली भरपूर मागणी लक्षात घेत कंपनीने 16 GBचा प्लेबुक १३,४९० रुपयांना उपलब्ध करुन दिला आहे. प्लेबुक भारतात जून महिन्यात लँच करण्यात आलं होतं. प्लेबुकच्या 16GB ची मुळ किंमत २७,९९० आहे आता सध्या फेस्टिव्हल ऑफर म्हणून ते १३,४९० रुपयांना कंपनीने उपलब्ध करुन देण्यात आला आहे असं रिमच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे. टॅबलेट पीसी आकाराने छोटा असला तरी त्यात पीसीचे सगळे फंक्शन उपलब्ध असतात. कंपनीने 32 GB आणि 64 GB च्या किंमतीतही कपात केली आहे. प्लेबुकचे 32 GB १५,९९० रुपयांना तर 64 GB हे मॉडेल २७,९९० रुपयांना उपलब्ध करुन देण्यात आलं आहे.
सध्या 32 GB ची किंमत ३२,९९० तर 64 GB ची किंमत ३७,९९० इतकी आहे. त्यामुळे ही दोन्ही मॉडेल्स निम्म्या किंमतीत मिळणार असल्याने ग्राहकांच्या उड्या प्लेबुकवर पडतील हे मात्र नक्की.