गुगलचं नाही 'खरं', फेसबुकचं आपलं 'बरं'

फेसबुकला मागे टाकण्याच्या प्रयत्नात गुगलचे आपल्या अन्य सेवांकडे दुर्लक्ष होत आहे का, असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. हा प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे सर्च इंजिनमध्ये गुगलला याहू आणि बिंगने मागे टाकले आहे.

Updated: Jul 3, 2012, 09:58 PM IST

www.24taas.com, न्यूयॉर्क

 

फेसबुकला मागे टाकण्याच्या प्रयत्नात गुगलचे आपल्या अन्य सेवांकडे दुर्लक्ष होत आहे का, असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. हा प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे सर्च इंजिनमध्ये गुगलला याहू आणि बिंगने मागे टाकले आहे. गेल्या काही वर्षांपासून सर्च इंजीनमध्ये गुगल आघाडीवर राहीले आहे. केवळ अमेरिका नव्हे तर जगभरातील अन्य देशात इंटरनेट सर्चमध्ये गुगल किंगच राहिलेला आहे.

 

मात्र गुगलच्या या अव्वल स्थाला पहिल्यांदाच धक्का बसला आहे. याहू, बिंग या दोघांची तुलना करता गुगलच्या सक्सेस रेटमधील अंतर हा महत्त्वाचा ठरतो. खरतर सर्च इंजिनच्या स्पर्धेत याहूचा कधी विचार केला गेला नाही. मात्र गुगल आणि बिंगच्या स्पर्धेत बाजी मारली ती याहूने. सर्च इंजिनच्या स्पर्धेत माक्रोसॉफ्टने उडी घेतल्यानंतर गुगलची आणि त्याची स्पर्धा कधीच नव्हती. तरीही एका छोट्या टप्प्यावर बिंगने गुगलला मात दिली आहे. अर्थात ही झाली जागतिक माहिती अमेरिकेतील गुगलचा सक्सेस रेट सर्वाधिक आहे. खरतर इंटरनेटवरील युजर्सला फेसबुकवरुन गुगल प्लसकडे वळवण्याचे गुगलचे हे प्रयत्न आहेत.

 

गुगल प्लसच्या युजर्सनी सर्वांसाठी शेअर केलेल्या पोस्ट केवळ सर्च इंजीनमध्ये दिसत नाहीत. तर त्यावर अन्य युजर्सनी दिलेल्या प्रतिक्रिया, पसंतीची माहितीही संबंधीत युजरला देण्याची सोय गुगलने दिली आहे. जुलैच्या अखेरीस सुरु झालेल्या गुगल प्लस युजर्सकडून मिळालेला प्रतिसाद केवल अश्चर्यजनक आहे. सोशल नेटवर्किंग वेबसाईटमध्ये आतपर्यंत इतक्या मोठा प्रतिसाद कोणत्याही वेबसाइटला मिळालेला नाही. गुगल प्लसचे आतापर्यंत २५ मिलियन युजर्स झाले आहेत.   याच दरम्यान गुगल प्लसवर गेम्सही दाखल झाले आहेत. फेसबुकला मागे टाकण्यासाठी युजर्सच्या हातात, त्याला हव असणार सर्व काही देण्याची तयारी गुगलने केल्याचे दिसते.