'गलगले' बुद्धिमान झाले !

बऱ्याच जणांना आत्मालाप करायची म्हणजेच स्वतःशीच बोलायची सवय असते. पण, आता त्याबद्दल लाजायचं कारण नाही. कारण, स्वतःशी बोलण्यामुळे विचारशक्ती आणि समज विकसित होते, असा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे.

Updated: Apr 25, 2012, 05:13 PM IST

www.24taas.com, वॉशिंग्टन

 

स्वतःशीच जोरजोरात गप्पा मारणारा 'सही रे सही'मधील भरत जाधवचा 'गलगले' सगळ्यांनाच खूप आवडला. पण, प्रत्यक्षात असे स्वतःशी बोलणारे लोक आपल्याला वेडसर वाटतात. तरीही बऱ्याच जणांना आत्मालाप करायची म्हणजेच स्वतःशीच बोलायची सवय असते. पण, आता त्याबद्दल लाजायचं कारण नाही. कारण, स्वतःशी बोलण्यामुळे विचारशक्ती आणि समज विकसित होते, असा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे.

 

साधारणतः स्वतःशी बोलणारा मुलं काहीशी विक्षिप्त वाटतात, पण शास्त्रज्ञांच्या मते यातून मुलांच्या वागणुकीचा चांगला अभ्यास करता येऊ शकतो. त्यांच्या वागण्याचे अर्थ समजायला मदत मिळते.

 

या गोष्टीमुळे लहान मुलांप्रमाणेच प्रौढांसाठीही लाभदायक आहे का, याचा शोध ‘जर्नल ऑफ एक्सपेरिमेंटल साइकोलॉजी’ मध्ये प्रकाशित झालेल्या लेखातून घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या शोधातून असं लक्षात आलंय, की आत्मालाप करणाऱ्या प्रौढांच्या विचारपूर्वक वागण्याच्या क्षमतेमध्ये सुधारणा झाली आहे. असे लोक आणखी बुद्धिमान बनले आहेत.