www.24taas.com, मुंबई
यंदा राज्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी पडेल असा अंदाज हवमान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पावसाळ्यात एल-निनो हा घटक सक्रिय होण्याची चिन्ह आहेत. त्याचा परिणाम पावसावर होण्याची शक्यता व्यक्त होती आहे.
दक्षिण आशियायी देशांसाठी यंदाच्या मान्सूनचा अंदाज शुक्रवारी जाहीर करण्यात आला. त्यानुसार महाराष्ट्राच्या काही भागांसह बहुतांश दक्षिण भारत आणि वायव्य भारतात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. सौराष्ट्र-कच्छ, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश या पट्ट्यात सरासरीपेक्षा कमी म्हणजे ९६ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात आधीच दुष्काळाची परिस्थिती भीषण आहे.
त्यात पाऊस कमी पडल्यास दुष्काळात तेरावा महिना असचं म्हणावं लागाणार आहे. महाराष्ट्रात दुष्काळाचा परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. पाण्याची टंचाई आणि चाऱ्याच्या कमतरतेनं ग्रामस्थांची आणि जनावरांची परवड कायम आहे. शेकडो ग्रामस्थांना स्थलांतरीत व्हावं लागतं आहे. कायमस्वरुपी उपाययोजनांसाठी जलसिंचन योजनांची गरज आहे. मात्र राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी हे सगळं स्वप्नवतच आहे.