www.24taas.com, मुंबई
जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि पालिका निवडणुकीसाठी राज्यात काही किरकोळ प्रकार वगळता मतदान उत्साहात सुरू आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मान्यवर नेते मंडळी आणि स्टार मंडळी मतदान बुथवर आली होती. मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे कुटुंबिय तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदान केले. तर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी पर्वती पायथा येथील ज्ञानदीप शाळेत मतदानाचा हक्क बजावला.
गालबोटचा शिक्का
दक्षिण मुंबईत अनेक ठिकाणी मतदारयाद्यांचा घोळ झाल्यामुळे मतदान केंद्रांवर गोंधळाचे वातावरण दिसले. राज्यात नाशिक येथे पैसे वाटप केल्याने मनसेने राडा केला. तर अकोला येथे अज्ञाताकडून दगडफेक केल्याने मतदानाला आलेल्यांची धावपळ उडाली. नागपूरमध्ये एका ठिकाणी तर अकोल्यामध्ये दोन ठिकाणी मतदान यंत्र बंद पडल्यामुळे सकाळी मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला. तातडीने यंत्र बदलून मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या घटना वगळता मतदान शांतते सुरू आहे.
खासदार मनोहर जोशी
दादर येथे शिवसेना नेते आणि खासदार मनोहर जोशी यांनी सपत्नीक मतदान केले. दादरमध्ये मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह असून मतदानासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत.
.
.
सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे
सोलापूरमध्ये केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला.
.
.
सबसे बडा खिलाडी
कॉमनवेल्थ घोटाळ्यातील प्रमुख आरोपी सुरेश कलमाडी यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या कर्वेनगरमधील कलमाडी हायस्कूलमध्ये त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. नऊ महिन्यांच्या तिहारवारीनंतर कलमाडी पुण्यात आले आहेत. पुण्याचे खासदार असलेल्या कलमाडींनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. यावेळी सबसे बडा खिलाडी, अशी चर्चा सुरू होती.
नितीन गडकरी स्कुटीवरुन
तर भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांनी स्कुटीवरुन मतदान केंद्र गाठत मतदानाचा हक्क कुटुंबियांसह बजावला. गडकरींचं नागपुरातल्या महाल भागात वास्तव्य आहे. त्यांनी हटके अंदाजात मतदानकेंद्र गाठत मतदान केलं.
नागपूर महानगरपालिकेसाठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. याठिकाणी पहिल्या चार तासांत २३.७३ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. नागपूर महापालिकेतील १४५ जागांसाठी आज मतदान होत असून, १०२९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे.
देवेंद्र फडणविस
.
.
.