काटेवाडीत रंगणार 'गोल रिंगण'...

निरा स्नानानंतर माऊलींच्या पालखीनं सातारा जिल्ह्यात प्रवेश केलाय. यावेळी माऊलीच्या पालखीच्या स्वागतासाठी साता-याचे जिल्हाधिकारी उपस्थित होते. अतिशय भक्तीभावाच्या वातावरणात माऊलींचं स्वागत करण्यात आलं.

Updated: Jun 20, 2012, 11:28 AM IST

www.24taas.com, सातारा

निरा स्नानानंतर माऊलींच्या पालखीनं सातारा जिल्ह्यात प्रवेश केलाय. यावेळी माऊलीच्या पालखीच्या स्वागतासाठी साता-याचे जिल्हाधिकारी उपस्थित होते. अतिशय भक्तीभावाच्या वातावरणात माऊलींचं स्वागत करण्यात आलं.

आजही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम लोणंद इथे असणार आहे. तर तुकाराम महाराजांची पालखी काल उंडवळी गवळ्याचीवरुन मार्गस्थ झाली. ब-हाणपूर, मोरेवाडी, सराफ पेट्रोल पंप, बारामती असं मार्गक्रमण करुन काल बारामती इथं पालखीचा मुक्काम होता. आज तुकोबांची पालखी संसरला पोहचेल. दरम्यान, काटेवाडी इथं दुपारी मेंढ्यांचा गोल रिंगणाचा सोहळा पार पडणार आहे.

.