सेक्स वर्करला नकाराचा अधिकार

सेक्स वर्कर महिलांना आता आपल्याला नको असणारा ग्राहक नाकारण्याचा मिळाला आहे. कुठलाही ग्राहक सेक्स वर्कर महिलेवर ‘सेक्स’साठी जबरदस्ती करू शकत नाही. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. पिसाळ यांनी दिलेल्या निकाला हे सांगण्यात आले आहे.

Updated: Mar 1, 2012, 10:25 AM IST

www.24taas.com, पुणे

सेक्स वर्कर महिलांना आता आपल्याला नको असणारा ग्राहक नाकारण्याचा मिळाला आहे. कुठलाही ग्राहक सेक्स वर्कर महिलेवर ‘सेक्स’साठी जबरदस्ती करू शकत नाही. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. पिसाळ यांनी दिलेल्या निकाला हे सांगण्यात आले आहे.

२५ जुलै २०१० रोजी रात्री हुसगाबाद येथील अरविंद शिवलाल डागर या २५ वर्षीय युवकाने सेक्स वर्कर मुलीने येण्यास नकार दिल्यावर संतापून तिच्या गालावर ब्लेडने वार केले होते. हा प्रकार पुणे स्टेशन येथे रात्री साडे दहाच्या सुमारास घडला होता. या प्रकरणी अरविंद शिवलाल डागरवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सहाय्यक सरकारी वकील अॅड. ए. व्ही. औसेकर यांनी चार साक्षीदारांची साक्ष काढली होती. अरविंद डागरला आता २ वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे. किंवा त्याऐवजी फक्त ५००० रुपये दंड भरून सहा महिन्यांच्या साध्या कैदेची शिक्षा त्याला मिळू शकते.