सांगलीमध्ये कायदा सुव्यवस्था धाब्यावर

सांगलीतल्या वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत तुफान हाणामारी झाली आहे. एकेकाळी सहकाराचा मानबिंदू मानल्या जाणाऱ्या वसंतदादा शेतकरी कारखान्यात सर्वसाधारण सबेत खुर्च्यांची फेकाफेक केली.

Updated: Mar 28, 2012, 10:17 PM IST

www.24taas.com, सांगली

 

सांगली जिल्ह्यातील वाळव्यात गुंड इर्षाद लांडगेनं धूमाकूळ घातला असतानाच दुसरीकडं सांगलीतल्या वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत तुफान हाणामारी झाली आहे. त्यामुळं गृहमंत्री आर. आर. पाटलांच्या जिल्ह्यातच कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसवल्याचं दोन घटनांवरुन दिसून येतं.

 

वाळव्यात राजकीय वरदहस्त लाभलेला इर्षाद लांडगे या गुंडानं अंदाधूंद गोळीबार करत आणि तलवार हल्ला करत पाच जणांना जखमी केलं. त्याच्याविरोधात गंभीर गुन्हे दाखल आहेत. परंतु त्याच्यामागे राजकीय पाठबळ असल्यामुळे पोलिसांना तो अजूनही सापडत नाही.

 

दुसरीकडं एकेकाळी सहकाराचा मानबिंदू मानल्या जाणाऱ्या वसंतदादा शेतकरी कारखान्यात सर्वसाधारण सबेत खुर्च्यांची फेकाफेक केली. तसंच राजू पाटील या सभासदाला मारहाण करण्यात आली. सत्ताधाऱ्यांनी आणलेल्या पैलवानांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतोय.