गृहमंत्र्यांच्या राज्यात गुंडांचा धुमाकुळ

सांगली जिल्ह्यातल्या वाळवा गावात कुख्यात गुंड इर्षाद लांडगेनं हवेत गोळीबार आणि तलावारीनं हल्ला केला आहे. या हल्ल्यात पाच जण जखमी झाले असून एका युवकाचं अपहरणही करण्यात आलंय. रामचंद्र मदने या युवकाचं अपहरण झालंय.

Updated: Mar 28, 2012, 08:53 PM IST

www.24taas.com, सांगली

सांगली जिल्ह्यातल्या वाळवा गावात कुख्यात गुंड इर्षाद लांडगेनं हवेत गोळीबार आणि तलावारीनं हल्ला केला आहे. या हल्ल्यात पाच जण जखमी झाले असून एका युवकाचं अपहरणही करण्यात आलंय. रामचंद्र मदने या युवकाचं अपहरण झालंय.

राजकीय वैमनस्यातून लांडगे टोळीनं गावात हैदोस घातला असून गावात तणावाचे वातावरण निर्माण झालंय. वाळव्यात राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तैनात करण्यात आलीय. गुंड इर्षाद लांडगेवर खून, मारामाऱ्या अशा प्रकारचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसंच २००५ मध्ये त्यानं पोलिसांवरही गोळीबार केला होता.

गेली अनेक वर्षे इर्षाद लांडगे फरार आहे. वाळव्यासारख्या गावात तो खुलेआम फिरताना सर्वसामान्यांना दिसतो, परंतू पोलिसांना दिसत नसल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय. राजकीय वरदहस्त असल्यानंच त्याची गुंडगिरी फोफवली असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय.

[jwplayer mediaid="73557"]