संघाशी संघटन नाही- अण्णा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आपला काहीही संबंध नसल्याचं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितलंय. अण्णा संघाच्या कार्यक्रमाला हजर राहत असल्याचं वक्तव्य काल कोलकत्यामध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं होतं. त्यावर अण्णांनी हे स्पष्टीकरण दिलंय.

Updated: Nov 10, 2011, 12:21 PM IST

झी २४ तास वेब टीम, राळेगणसिद्धी

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आपला काहीही संबंध नसल्याचं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितलंय. अण्णा संघाच्या कार्यक्रमाला हजर राहत असल्याचं वक्तव्य काल कोलकत्यामध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं होतं. त्यावर अण्णांनी हे स्पष्टीकरण दिलंय. मोहन भागवत, सोनिया गांधी हे सगळेच आपल्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतायत, त्याचा आपल्यावर कोणताही परिणाम होणार नाही असंही अण्णांनी म्हटलंय.

 

कोलकातामध्ये स्वयंसेवकांना संबोधित करताना भागवत यांनी अण्णांना आपला पाठिंबा असल्याचं वक्तव्य केलं. अण्णांचे आणि संघाचे जुने संबंध असल्यामुळे त्यांनी आमच्या ग्रामविकास कार्यक्रमातही आम्हाला  मदत केली होती. शिवाय त्यांनी स्वयंसेवकांना ट्रेनिंगही दिल्याचं भागवत यांनी म्हटलं होतं.
भ्रष्टाचारविरोधी मोहीम घेण्यासाठी संघानेच अण्णांना सुचवलं होतं आणि यासंदर्भात माझी आणि अण्णांची भेटदेखील होणार होती. मात्र काही कारणांनी ती शक्य झाली नाही, असं भागवत यांनी म्हटलं होतं. अण्णांनी मात्र या वक्तव्याचा साफ इन्कार केला आहे.