विहीरीत पाणी नव्हे पेट्रोल...

अहमदनगरपासुन १५ किमी अंतरावर असलेल्या इंडियन ऑईल आणि भारत पोट्रोलियम डेपो गेट समोर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं आहे. इंडियन ऑईल आणि भारत पेट्रोलियमच्या डेपोगेटमधून पेट्रोल गळती होते आहे.

Updated: Apr 5, 2012, 04:14 PM IST

www.24taas.com, अहमदनगर

अहमदनगरपासुन १५ किमी अंतरावर असलेल्या इंडियन ऑईल आणि भारत पोट्रोलियम डेपो गेट समोर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं आहे. इंडियन ऑईल आणि भारत पेट्रोलियमच्या डेपोगेटमधून पेट्रोल गळती होते आहे.

डेपोजवळ असलेल्या विहीरीत पेट्रोल मिश्रीत पाणी आढळलं आहे, ४ ते ५ इंचाचा पेट्रोलचा थर विहीरीत आढळला. त्यामुळे शेतकऱ्यांना पिण्याच्या आणि शेतीसाठीच्या पाण्याची समस्या मोठी आहे. याविरोधात शेतकऱ्यांनी डेपोगेट बंद करत आंदोलन केलं.

विहीरीतील पाणी हे पेट्रोलमिश्रीत असल्याने येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत . कारण की, ते उभ्या पिकांना पाणी देऊ शकत नाही, कारण की, पिकांना पाणी दिल्यास ती जळून जातील. म्हणूनच हे आंदोलन करण्यात आलं.