लाचखोर दंडाधिकाऱ्याला सक्तमजुरी

कांबळेला 26 फेब्रुवारी 2004 मध्ये चारशे रुपये लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. 400 रुपयांची ही लाच त्याला चांगलीच महागात पडली. लाचखोर भूपाल कांबळेविरोधातल्या खटल्यात सांगलीतल्या न्यायालयानं त्याला चार वर्षांची सक्तमजुरी ठोठावली आणि याशिवाय 20 हजार रुपये दंडही न्यायालयानं ठोठावला.

Updated: Dec 5, 2011, 03:23 PM IST

झी २४ तास वेब टीम, सांगली

एकीकडे कल्याणमध्ये लाचखोर पोलिस उपनिरीक्षकाकडे करोडोंची संपत्ती सापडली असताना तिकडे सांगलीत जिल्हा अधिकारी कार्यालयातल्या लाचखोर विशेष कार्यकारी दंडाधिकारी भूपाल कांबळेला 400 रुपये लाच घेतल्याप्रकरणी चार वर्षांची सक्तमजुरी आणि 20 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्य़ात आलीय. सांगली न्यायालयानं ही शिक्षा सुनावलीय.

Tags: