राष्ट्रवादीचे सव्वा-सव्वा वर्षांसाठी महापौरपद

पुण्याचे महापौरपद चार जणांना सव्वा-सव्वा वर्षांसाठी देण्यात येणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसनं तसा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत गटबाजीला उधाण येण्याची शक्यता असल्याने सव्वा-सव्वा वर्षांची संधी देण्याची कल्पना पुढे आल्याची चर्चा आहे.

Updated: Mar 8, 2012, 08:32 PM IST

www.24taas.com, पुणे

पुण्याचे महापौरपद चार जणांना सव्वा-सव्वा वर्षांसाठी देण्यात येणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसनं तसा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत गटबाजीला उधाण येण्याची शक्यता असल्याने  सव्वा-सव्वा वर्षांची संधी देण्याची कल्पना पुढे आल्याची चर्चा आहे.

महापौरपदासाठी इच्छुक आठ जणांच्या मुलाखती पक्षाचे नेते अजित पवार यांनी घेतल्या. राष्ट्रवादीचा पाच वर्ष महापौर तर उपमहापौरपद कॉंग्रेसकडे असणार आहे. इतर पदांबाबत मात्र चर्चा सुरु आहे. गटबाजी रोखण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी राष्ट्रवादीचा हा नवा फंडा कितपत यशस्वी होतो, याकडे लक्ष लागले आहे. मात्र, कमी कालावधीत महापौर आपल्या पदाला न्याय देऊ शकेल का? हा प्रश्न आहे. यातून विकासाला चालना मिळण्या ऐवजी खिळ बसण्याची शक्यता अधिक असल्याने राजकीय फायद्यासाठी हे सर्व चालल्याची प्रक्रिया उमटत आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये त्रांगड

दरम्यान,  पिंपरी-चिंचवडचा महापौर ठरवण्यासाठी आज अजित पवारांनी पिंपरीत बैठक घेतली खरी. पण कुणाचंही नाव जाहीर न करताच अजित पवार निघून गेले. त्यामुळे आता महापौरपद कुणाला मिळणार हे उद्या फॉर्म भरतानाच स्पष्ट होणार आहे. दरम्यान महिला दिनाचं औचित्य साधत पिंपरी-चिंचवड महापौरपदी चांगला चेहरा देऊ, असं वक्तव्य अजित पवारांनी पुण्य़ात केलंय. त्यामुळे हा चांगला चेहरा कोण, याची उत्सुकता आहे.