होळीला गालबोट, अपघातात चार विद्यार्थी ठार

कोकणात होळी साजरी करून परतणा-या चार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर काळानं घाला घातला. देहूजवळ कार आणि ट्रकच्या अपघातात चार जण ठार झालेत.

Updated: Mar 8, 2012, 03:20 PM IST

www.24taas.com,पुणे

 

 

कोकणात होळी साजरी करून परतणा-या चार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर काळानं घाला घातलाय. देहूजवळ कार आणि ट्रकच्या अपघातात चार जण ठार झालेत.

 

 

अनिल लिंबोरे,अमोल पोफळे, सचिन वहिले आणि अक्षय वहिले अशी मरण पावणा-यांची नावं आहेत. होळी साजरी करण्यासाठी ते मुरूडजवळील एका गावात मित्राच्या नातेवाईकांकडे गेले होते. तिथून परतत असतांना त्यांच्या कारला देहूजवळ एक ट्रकनं जोरदार धडक दिली.

 

 

या अपघातात चार जण ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झालेत. मरण पावलेले चौघेही महाविद्यालयीन विद्यार्थी होते.