मावळ पोलिसांची अरेरावी वाढतेय?

मावळ गोळीबारप्रकरणी पोलिसांनी त्यांच्या कारवाईचा वेग वाढवला आहे. शेतकऱ्यांना चौकशीसाठी बोलावून अचानक अटक करण्याची कारवाई पोलिसांनी सुरु केली आहे. पोलिसांच्या या अटकसत्रामुळे मावळातील शेतकरी धास्तावले आहेत.

Updated: Apr 2, 2012, 09:20 PM IST

www.24taas.com, पुणे

मावळ गोळीबारप्रकरणी पोलिसांनी त्यांच्या कारवाईचा वेग वाढवला आहे. शेतकऱ्यांना चौकशीसाठी बोलावून अचानक अटक करण्याची कारवाई पोलिसांनी सुरु केली आहे. पोलिसांच्या या अटकसत्रामुळे मावळातील शेतकरी धास्तावले आहेत.

त्यामुळे पोलिसांची नोटीस मिळालेल्या शंभरहून अधिक शेतकऱ्यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयात १०३ शेतकऱ्यांनी अटक पूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.  अचानक चालवण्यात आलेल्या अटक सत्रामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरातील लग्न आणि गावातील जत्रांवर परिणाम झाला आहे.

शुक्रवारीही ४७ शेतकऱ्यांना अचानक अटक करुन १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. या ४७ शेतकऱ्यांच्याप्रमाणेच १०३ शेतकऱ्यांना चौकशीच्या नोटीसा मिळाल्या आहेत. पोलिसांच्या या अचानक कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

गोळीबार करणाऱ्या पोलिसांपैकी कोणालाही अटक केलेली नाही. मात्र शेतकऱ्यांवर कारवाई होते आहे याचा निषेध म्हणून या शेतकऱ्यांनी सामुहीक अटक करून घेण्याची तयारी दाखविली आहे.