मावळमध्ये पोलिसांच्या अटकसत्राने शेतकरी धास्तावले

मावळ गोळीबारप्रकरणी पोलिसांनी त्यांच्या कारवाईचा वेग वाढवलाय.. शेतक-यांना चौकशीसाठी बोलावून अचानक अटक करण्याची पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे.. पोलिसांच्या या अटकसत्रामुळे मावळातील शेतकरी धास्तावले आहेत

Updated: Apr 2, 2012, 01:59 PM IST

www.24taas.com, मावळ

 

मावळ गोळीबारप्रकरणी पोलिसांनी त्यांच्या कारवाईचा वेग वाढवलाय.. शेतक-यांना चौकशीसाठी बोलावून अचानक अटक करण्याची पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे.. पोलिसांच्या या अटकसत्रामुळे मावळातील शेतकरी धास्तावले आहेत. त्यामुळे पोलिसांची नोटीस मिळालेल्या शंभरहून अधिक शेतक-यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयात 103 शेतक-यांनी अटक पूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.

 

 

अचानक  चालवण्यात आलेल्या अटक सत्रामुळे अनेक शेतक-यांच्या घरातील लग्न आणि गावातील जत्रांवर परिणाम झाला आहे. शुक्रवारीही 47 शेतक-यांना अचानक अटक करुन 15 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आलीय.  या 47 शेतक-यांप्रमाणेच 103 शेतक-यांना चौकशीच्या नोटीसा मिळाल्या आहेत. पोलिसांच्या या अचानक कारवाईमुळे शेतक-यांमध्ये संतापाच वातावरण आहे. गोळीबार करणा-या पोलीसांपैकी कोणालाही अटक केलेली नाही. मात्र शतक-यांवर कारवाई होतीय याचा निषेध म्हणून या शेतक-यांनी सामुहिक अटक करून घेण्याची तयारी दाखविली आहे.

 

 

 

Tags: