www.24taas.com, शिर्डी
शिर्डीत साई बाबा मंदिर परिसरात 95 हजार रुपयांची रोकड चोरीला गेलीयं. मंदिर परिसरातील कापडकोठीतून ही रक्कम पळवण्यात आलीये. विशेष म्हणजे प्रशासनाकडे याबाबत विचारपूस केली असता, या घटनेबाबत प्रशासनाने कानावर हात ठेवलेत. याबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. चोरीच्या घटनेला 12 तास उलटल्यानंतरही प्रशासनाला याची खबरच नसल्याचं सांगण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येतं आहे.
मागच्याच आठवड्यात दिवेआगर येथील मंदिरात चोरी झाली होती. रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यातील दिवे आगरमध्ये सुवर्ण गणेश मंदिरावर दरोडा टाकण्यात आला आहे. पेशवेकाळीन मंदिरातून दरोडेखोरांनी दीड किलो वजनाची सोन्याची मूर्ती पळवलीय. दोन वॉचमनला मारहाण करून हा दरोडा रात्री घालण्यात आला.
दरोडेखोरांनी मूर्तीच्या अंगावर असलेले दागिनेही लांबविलेत. प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेलं हे मंदिर भाविकांच्या श्रद्धेचं ठिकाण आहे. मात्र याच मंदिरावर दरोडा पडल्यानं भाविकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या मतदारसंघात ही घटना आहे. सुवर्ण गणेश मंदिरात चोरी करताना चोरट्यांनी सुरक्षा रक्षकांना मारहाण करून सोन्याची मूर्ती पळविली . पळवलेल्या या मूर्तीची किंमत ६० लाख आहे. या मूर्तीचे वजन दीड किलो आहे.
[jwplayer mediaid="76024"]