भामटयाला भर रस्त्यात चोप

कोल्हापूर मध्ये एका भामट्याला भर रस्त्यात चोप दिला गेला, अनेक लोकांना लुबाडणाऱ्या भामट्याला फसलेल्या लोकांनी चांगलच चोपून काढलं आहे. पर्सनल लोन मिळवून देतो, असं सांगून लोकांची फसवणूक करणाऱ्या एका भामट्याला कोल्हापुरात नागरिकांनीच चोप दिला.

Updated: Nov 8, 2011, 04:59 PM IST

झी २४ तास वेब टीम, कोल्हापूर

 

कोल्हापूर मध्ये एका भामट्याला भर रस्त्यात चोप दिला गेला, अनेक लोकांना लुबाडणाऱ्या भामट्याला फसलेल्या लोकांनी चांगलच चोपून काढलं आहे.  पर्सनल लोन मिळवून देतो, असं सांगून लोकांची फसवणूक करणाऱ्या एका भामट्याला कोल्हापुरात नागरिकांनीच चोप दिला. कोल्हापुरात खासबाग मैदानात हा सर्व प्रकार घडला. वेगवेगळ्या बँकांमध्ये आपली ओळख असून, कर्ज मिळवून देतो असं सांगून हा भामटा गरजूकंडून पैसे उकळीत होता.

 

काही जणांकडून तर त्याने 20 हजारांपर्यंत रक्कम घेतली होती. मात्र पैसे घेऊन हा भामटा गायब झाला होता. वारंवार संपर्क साधूनही तो टाळाटाळ करत होता. अखेर खासबाग मैदानात परिसरात हा भामटा दिसल्यानंतर नागरिकांनी याला भररस्त्यात चोप दिला.