पुण्यात मस्तवाल तरुणांनी घेतला बळी

पुण्यात मस्तवाल तरुणांनी दुचाकीस्वाराला गाडीने ठोकल्यानंतर त्या तरुणाला निर्जन स्थळी फेकल्याची धक्कादायक घटना काल मध्यरात्री घडली. घटनास्थळी सापडलेल्या गाडीच्या नंबरप्लेटमुळे तीन आरोपींना गजाआड टाकण्यात पोलिसांना यश आले आहे.

Updated: Nov 3, 2011, 10:28 AM IST

झी २४ तास वेब टीम, पुणे

 

पुण्यात मस्तवाल तरुणांनी दुचाकीस्वाराला गाडीने ठोकल्यानंतर त्या तरुणाला निर्जन स्थळी फेकल्याची धक्कादायक घटना काल मध्यरात्री घडली. घटनास्थळी सापडलेल्या गाडीच्या नंबरप्लेटमुळे तीन आरोपींना गजाआड टाकण्यात पोलिसांना यश आले आहे.

 

या अपघातात मयुर गुजर या तरुणाचा तडफडून मृत्यू झाला. पोलिसांनी जितेन गरुड, रविंद्र गरुड आणि जितेंद्र गायकवाड या तिघांना ताब्यात घेतले आहे.

 

हडपसर परिसरातील बी.टी.कवडे या परिसरात काल रात्री ही घटना घडली. कॉल सेंटरमध्ये कामाला असलेला मयूर आपल्या होंडा अॅटिव्हा या दुचाकीने घरी परतत होता. तेवढ्यात भरधाव वेगाने समोरून आलेल्या फोर्ट आयकॉनने मयूरच्या गाडीला धडक दिली.

 

अपघात झाल्यावर घटनास्थळी गर्दी जमली. कारमधील तिघांनी मयूरला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो, असे सांगून मयूरला गाडीत बसविले. मात्र, त्यांनी हॉस्पिटलमध्ये न नेता एका निर्जन ठिकाणी फेकून दिले. उपचार न मिळाल्याने अतिरक्तस्राव होऊन मयूरचा मृत्यू झाला.

 

दुसऱ्या दिवशी मयूरचा मृतदेह रेसकोर्सच्या झाडीत आढळून आला. त्याची हत्या झाली असल्याचा संशय पोलिसांना आला. मात्र, घटनास्थळी सापडलेल्या नंबर प्लेटवरून नेमक्या प्रकरणाचा उलगडा झाला. पोलिसांना हडपसर येथील स्वामी विवेकानंद नगरमधून तिघांना अटक केले.

Tags: