पुण्यात झालेल्या अपघात ५ ठार

पुणे जिल्ह्यात पहाटेच्या सुमारास झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात पाच जण ठार झालेत. मृतांमध्ये पतीपत्नीचा समावेश आहे. दरम्यान, नाशिकच्या सप्तशृंगी गडावरून परतणा-या भाविकांच्या टेम्पोला काल रात्री अपघात झाला यात १७ जण जखमी झालेत.

Updated: May 5, 2012, 11:22 AM IST

www.24taas.com, पुणे

 

पुणे जिल्ह्यात पहाटेच्या सुमारास झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात पाच जण ठार झालेत. मृतांमध्ये पतीपत्नीचा समावेश आहे.

 

शिरुरजवळच्या बेलवंडी फाट्याजवळ कलाकारांच्या मिनी बसला अपघात झाला. यात दोन कलाकारांचा जागीच मृत्यू झाला. तर मिनीबसचा ड्रायव्हर अपघातात जखमी झालाय. तर दुसरा अपघात देहू रोडजवळ झालाय. एका कारला अज्ञात वाहनानं दिलेल्या धडकेत तिघे जण ठार झालेत. मृतांमध्ये पतीपत्नीचा समावेश आहे.

 

नाशिक अपघात, १७ जखमी

दरम्यान,  नाशिकच्या सप्तशृंगी गडावरून परतणा-या भाविकांच्या टेम्पोला काल रात्री अपघात झाला यात १७ जण जखमी झालेत. त्यातल्या तिघांची प्रकृती गंभीर आहे. आनंदवल्ली गावाजवळील चांदशीचे  हे सर्व रहिवासी आहेत. काल धार्मिक कार्यक्रमासाठी हे सर्व सप्तशृंगी गडावर गेले होते. देवीच दर्शन घेऊन परतत असताना टेम्पोचे ब्रेकफेल झाले. त्यामुळं टेम्पो रत्याशेजारच्या कठड्यावर  आदळून पलटी झाला. या अपघातात १७ प्रवासी जखमी झालेत.

 

त्यातील काही किरकोळ जखमींना वाणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. तर उरलेल्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात रात्री उशिरा हलविण्यात आलं. टेम्पोमध्ये ३५ ते ४० जण प्रवास करत असल्याची माहिती जखमींनी दिली असून जखमींमध्ये महिलांसह लहान  मुलांचाही समावेश आहे. याप्रकरणी कळवण पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतंलय. टेम्पो दरीत कोसळला असता तर मोठी जिवीतहानी झाली असती.