www.24taas.com, पुणे
पुणेकरांवर वरुणराजा रुसल्यानं पुणेकरांवरच पाणीसंकट आणखी वाढलं आहे. पुण्यात उद्यापासून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाण्याची शक्यता आहे. पुण्यात एकप्रकारे पाणीबाणी जाहीर होत असल्यानं पुणेकरांना पाण्याच्या वापराचं नियोजन करावं लागणार आहे.
पुण्याला पाणीपुरवठा करणा-या धरणांमध्ये सध्या अवघा वीस दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळं या पाण्याचं नियोजनाचा एक भाग म्हणून एक दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.
पुणे आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सध्या पाऊस प़डतोय मात्र तो अतिशय तुरळक स्वरुपाचा आहे. त्यामुळं मोठा पाऊसच पुणेकरांवरील पाण्याचं संकट दूर करु शकणार आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत हा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.