दौंडमध्ये कुल यांची राष्ट्रवादीला हूल

पुणे जिल्ह्यातल्या दौंड मध्ये स्थानिक आघाडीनं राष्ट्रवादीला धक्का दिला आहे. राष्ट्रवादीला केवळ जागा मिळाल्या असून राहुल कूल यांच्य़ा स्थानिक आघाडीनं 19 जागा जिंकून पालिकेवर सत्ता मिळवली. त्यामुळं राष्ट्रवादीचे आमदार रमेश थोरात याना हा मोठा धक्का मानला जातो.

Updated: Dec 14, 2011, 05:02 PM IST

झी २४ तास वेब टीम, पुणे

 

पुणे जिल्ह्यातल्या  दौंड मध्ये स्थानिक आघाडीनं राष्ट्रवादीला धक्का दिला आहे. राष्ट्रवादीला केवळ जागा मिळाल्या असून राहुल कूल यांच्य़ा स्थानिक आघाडीनं 19 जागा जिंकून पालिकेवर सत्ता मिळवली. त्यामुळं राष्ट्रवादीचे आमदार रमेश थोरात याना हा मोठा धक्का मानला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसचेचे राहुल कुल यांनी नागरीक हित संरक्षण मंडळाच्या नावाखाली आघाडी उभारली होती. बारामती मतदार संघातली ही निवडणूक असल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यांनी प्रचारसभाही घेतल्या होत्या. मात्र अखेर कुल यांच्या आघाडीनं बाजी मारली.

पुणे जिल्ह्यातल्या दौंडमध्ये स्थानिक आघाडीनं राष्ट्रवादीला धक्का दिलाय. राष्ट्रवादीला केवळ 4 जागा मिळाल्या असून राहुल कूल यांच्य़ा स्थानिक आघाडीनं 19 जागा जिंकून पालिकेवर सत्ता मिळवलीय. त्यामुळं राष्ट्रवादीचे आमदार रमेश थोरात याना हा मोठा धक्का मानला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेसचेचे राहुल कुल यांनी नागरीक हित संरक्षण मंडळाच्या नावाखाली आघाडी उभारली होती. बारामती मतदार संघातली ही निवडणूक असल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यांनी प्रचारसभाही घेतल्या होत्या. मात्र अखेर कुल यांच्या आघाडीनं बाजी मारली.