गृहराज्यमंत्र्यांचा गुंडाच्या पत्नीला आशीर्वाद

कोल्हापुरात काँग्रेसने राष्ट्रवादीला दे धक्का देताना चक्क कुख्यात गुंड संजय वास्कर याच्या पत्नीला उमेदवारी देऊन तिला निवडूनही आणले. यात महत्वाची भूमिका गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी वटवली आहे.

Updated: Jan 31, 2012, 09:14 AM IST

www.24taas.com , कोल्हापूर

 

कोल्हापुरात काँग्रेसने राष्ट्रवादीला दे धक्का देताना चक्क कुख्यात गुंड संजय वास्कर याच्या पत्नीला उमेदवारी देऊन तिला निवडूनही आणले. यात महत्वाची भूमिका गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी वटवली आहे.

 

कोल्हापूर जिल्हापरिषदेसाठी पाचगाव गटातून मनिषा वास्कर यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर याच गटातून राष्ट्रवादीच्या स्मिता गवळी या निवडून आल्यात. त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली होती. गवळी यांनी काँग्रेसला पाठींबा दिलाय. पाचगाव गटातून मनिषा वास्कर यांच्या विरोधात स्मिता गवळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र गवळी यांनी जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी मागे घेतल्यामुळे मनिषा वास्कर यांची बिनविरोध निवड झालीये. तर पंचायत समितीसाठी अपक्ष अर्ज दाखल केलेल्या स्मिता गवळी यांनी काँग्रेसला पाठींबा दिलाय. यामुळे हे दोन्ही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून  काँग्रेसमध्ये आलेत.

 

गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी राष्ट्रवादीला धक्का देत त्यांना उमेदवारही मिळू दिला नाही. मनिषा वास्कर या मोक्काखाली अटकेत असलेल्या कुख्यात गुंड संजय वास्कर याच्या पत्नी आहेत. त्यामुळे गृहराज्यमंत्र्यांनी  त्यांना उमेदवारी देऊन निवडून कसे आणले , याबाबत आश्चर्य व्यक्त होतंय.