गृहमंत्र्यांच्या तालुक्यात माफिया राज

गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या तासगाव तालुक्यात वाळूमाफियांनी हैदोस घातला आहे. तहसील कार्यालयाच्या आवारातून जप्त केलेला ट्रॅक्टर पळवण्याचा प्रयत्न या माफियांनी केला आहे. इतकच नाही तर देखरेखीवर असलेल्या होमगार्ड्सवर प्राणघातक हल्ला केला.

Updated: Mar 10, 2012, 08:37 PM IST

www.24taas.com, सांगली

गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या तासगाव तालुक्यात वाळूमाफियांनी हैदोस घातला आहे. तहसील कार्यालयाच्या आवारातून जप्त केलेला ट्रॅक्टर पळवण्याचा प्रयत्न या माफियांनी केला आहे. इतकच नाही तर देखरेखीवर असलेल्या होमगार्ड्सवर प्राणघातक हल्ला केला.

या प्रकरणी सहा जणांविरूद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी आरोपी राजू थोरात, प्रविण थोरात, कुमार साळुंखे आणि धीरज साळुंखे फरार आहेत. राज्यात वाळू माफियांची दहशत आजही कायम आहे. खूद गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या तासगाव तालुक्याती घटनेवरून दिसून येत आहे. त्यामुळे राज्यात कायद्याचे राज्य आहे की माफियांचे, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

मध्यप्रदेशमध्ये खाणमाफियांचा धुमाकुळ सुरू आहे. या माफियांनी एका आयपीएस अधिकाऱ्याच्या अंगावर टॅक्टर घालून चिरडले. मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्या राज्यात माफिया राज असल्याने सर्वच थरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. नरेंद्र कुमार हे आपले कर्तव्य बजावत होते. या आधी महाराष्ट्रातही यशवंत सोनवणे यांचाही बळी भेसळ करणाऱ्या माफियांनी घेतला होता. त्यामुळे गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्याच तालुक्यात अशा घटना घडत असतील तर सामान्य माणसांनी न्याय कोणाकडे मागयचा, असा सवाल विचारण्यात येत आहे.

व्हिडिओ पाहा...

[jwplayer mediaid="63086"]