www.24taas.com, पुणे
राज्यात दुष्काळाचा सामना करावा लागत असल्याने लोक चिंतेत आहेत. तर अनेक ठिकाणी पाण्याची बोंब असल्याने सरकारच्या नावाने शिमगा सुरू आहे. काही ठिकाणी पाण्यासाठी पाण्यासारखा पैसा मोजावा लागत असल्याने संतापात भर पडत आहे. त्यातच उन्हाचा कडाका वाढत असल्याने सर्वांची काहीली झाली आहे. मात्र, दिलासा दिणारी बातमी पुणे वेध शाळेने दिली आहे. ही खूशबर म्हणजे, मान्सून दोन दिवस आधीच दाखल होणार आहे.
कडाक्याच्या उन्हात होरपळणा-या राज्यातल्या जनतेला हवामान खात्यानं दिलासा दिला आहे. राज्यात यंदा दोन दिवस आधीच मान्सून धडकणार आहे असा अंदाज पुणे वेधशाळेचा आहे. तर मुंबई आणि पुण्यात ७ जूनला मान्सून येईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. एकंदर पाऊसमान चांगलं असेल असं भाकित वर्तवल्यानं जनतेला दिलासा मिळाला आहे.
पावसाची माहिची देताना पुणे वेधशाळेच्या संचालिका मेधा खोले म्हणाल्या, या वर्षी पावसाचे आगमन दोन दिवस आधी आहे. हा पाऊस टप्प्या टप्प्याने राज्यात दाखल होईल. त्यानंतर पावसाची व्याप्ती वाढत जाईल आणि संपूर्ण देशात पाऊस बरसेल. मान्सूनचे दोन दिवस आगमन होत असल्याने याचा शेतीला फायदा होईल.
व्हिडिओ पाह..
[jwplayer mediaid="99421"]