झी २४ तास वेब टीम, पुणे
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर पुण्यातल्या संचेती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आलेत. अण्णांच्या छातीमध्ये इन्फेक्शन झालं असून तापही असल्यानं त्यांची प्रकृती खालावली आहे.
अण्णांना आणखी पाच दिवस पूर्णपणे विश्रांती घ्यावी, लागेल असं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं आहे. छातीत दुखू लागल्यानं अण्णांना काल पुण्यातल्या संचेती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, मुंबईतल्या आंदोलनानंतर टीम अण्णांची २ आणि ३ जानेवारीला होणारी बैठक अनिश्चित काळासाठी पुढं ढकलण्यात आली आहे. अण्णांवर पुण्यातल्या संचेती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे आणखी काही दि्वसासाठी अण्णांनां सक्त विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.