gulabrao devkar

Suresh Jain, Gulabrao Devkar And 46 Accused Proved Guilty In Gharkul Scam PT9M40S

जळगाव । घरकुल घोटाळा : सुरेश जैन यांना ७ वर्षांची शिक्षा, १०० कोटींचा दंड

घरकुल घोटाळा प्रकरणात शिवसेना नेते सुरेश जैन, माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांच्यासह सगळ्या आरोपींना दोषी जाहीर करण्यात आल्यानंतर त्यांना आता शिक्षाही ठोठावण्यात आली आहे. सुरेश जैन यांना ७ वर्ष कारावास आणि शंभर कोटी दंड आणि अजून वाढण्याची शक्यता आहे. तर गुलाबराव देवकर यांना पाच वर्षे कारावास आणि पाच लाख दंड अजून वाढण्याची शक्यता असून राजेंद्र मयूर, जगन्नाथ वाणी यांना प्रत्येकी चाळीस कोटी दंड आणि सात वर्षे कारावास ठोठावण्यात आला आहे. तर आरोपी सहा ते पंधरा यांना चार वर्षे कारावास आणि ४३ ते ५१ एक लाख दंड तसेच सात वर्षे चार आरोपींना शिक्षा आणि दंड ठोठावण्यात आला आहे. या निकालावर वकील समाधानी नाहीत. ते जन्मठेपेची शिक्षा व्हावी यासाठी उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत, अशी माहिती वकील प्रवीण चव्हाण यांनी दिली.

Aug 31, 2019, 06:35 PM IST

घरकुल घोटाळा : सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह सर्व दोषींना कारावासासह दंडाची शिक्षा

घरकुल घोटाळा प्रकरणात सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह सगळ्या आरोपींना शिक्षाही ठोठावण्यात आली आहे.  

Aug 31, 2019, 05:41 PM IST

घरकूल घोटाळा प्रकरणी देवकरांना सशर्त जामीन

जळगावातील घरकूल घोटाळा प्रकरणी माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे. मात्र गुलाबराव देवकर यांना आपल्या जळगाव तसेच शेजारील धुळे जिल्ह्यात न जाण्याच्या अटीवर हा जामीन देण्यात आला आहे. पुण्यात राहून कमिश्नर कार्यालयाला हजेरी लावण्याची सक्ती गुलाबराव देवकर यांना करण्यात आली आहे.

Jan 5, 2015, 03:42 PM IST

जळगाव महापालिका : मतमोजणी सुरू

जळगाव महापालिकेच्या ७५ जागांसाठी मतमोजणी सुरू झालीय. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, मनसे, तसंच खान्देश विकास आघाडीने यासाठी राजकीय प्रतिष्ठा पणाला लावलीय.

Sep 2, 2013, 11:14 AM IST

गुलाबरावांवर आरोप निश्चित, खुर्ची अनिश्चित!

जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी पालकमंत्री आणि राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह ४८ नगरसेवकांवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. तर मुख्य आरोपी आणि आमदार सुरेश जैन यांच्या गैरहजेरीबाबत २९ मे रोजी सुनावणी होणार आहे

May 27, 2013, 05:08 PM IST

राज ठाकरेंचा निशाणा कोणावर?

आपल्या उत्तर महाराष्ट्रातल्या दौ-यात जळगावमधील जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे कुणाकुणाचा समाचार घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

Apr 6, 2013, 06:07 PM IST

देवकरांचा राज्यमंत्रिपदाचा राजीनामा

अखेर जळगाव घरकूल घोटाळा गुलाबराव देवकरांना भोवडलंय. घोटाळ्यातले मुख्य आरोपी देवकरांनी अखेर परिवहन राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलाय.

Aug 8, 2012, 03:00 AM IST

देवकरांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा

जळगाव घरकूल घोटाळ्याप्रकरणी अटक टाळण्यासाठी परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांची धावाधाव सुरू झालीय. औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाविरोधात देवकारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय.

Aug 7, 2012, 03:03 PM IST

देवकरांना पुन्हा अटक होणार?

जळगाव घरकूल घोटाळा प्रकरणी परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर पुन्हा अडचणीत आले आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आरोप असल्यानं, देवकरांना पुन्हा अटक करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत.

Aug 6, 2012, 05:18 PM IST

वाघुर पाणी घोटाळा : गुलाबराव देवकरही अडचणीत

जळगावमध्ये घरकुल घोटाळ्यानंतर आता वाघूर पाणी योजना घोटाळा उघडकीस आलाय. या घोटाळ्यात सुरेश जैन यांच्या पाठोपाठ परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकरही गोत्यात आलेत. दोघांविरोधात गुन्हे दाखल झाल्यानं त्यांच्या अटकेची शक्यता व्यक्त होत आहे.

Jul 29, 2012, 08:51 PM IST

‘देवकरांनी राजीनामा द्यावा’

घरकुल घोटाळ्यांत अटक झालेल्या आणि नंतर जामीन मिळालेल्या राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केलीय.

May 22, 2012, 04:12 PM IST

राज्यमंत्री देवकरांना जामिन मंजूर

जळगावातील घरकुल घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेले राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांना अटक केल्यानंतर लगेचच जामीन मंजूर झाला आहे. कोर्टाने देवकर यांना ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन दिला आहे.

May 21, 2012, 07:03 PM IST