उत्तरांच्या शोधात 'उत्तर महाराष्ट्र काँग्रेस'

काँग्रेसमधील काही स्वयंघोषित नेते काँग्रेसच्या विकासाला बाधक ठरत आहेत. त्यांच्या बंदोबस्त केल्याशिवाय उत्तर महाराष्ट्रात विकास शक्य नसल्याचा सूर काँग्रेस मेळाव्यात आळवण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील दोनही लोकसभा मतदारसंघात काँग्रेस संपली असून जिल्हा परिषद, महापालिकेत नावापुरती काँग्रेस राहिली आहे.

Updated: Nov 7, 2011, 06:16 AM IST

झी २४ तास वेब टीम, नाशिक

काँग्रेसमधील काही स्वयंघोषित नेते काँग्रेसच्या विकासाला बाधक ठरत आहेत. त्यांच्या बंदोबस्त केल्याशिवाय उत्तर महाराष्ट्रात विकास शक्य नसल्याचा सूर काँग्रेस मेळाव्यात आळवण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं उत्तर महाराष्ट्र कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं होतं. यावेळी उत्तर विभागासाठी ठोस घोषणा न झाल्यानं कार्यकर्ते नाराज झाले. उत्तर महाराष्ट्रातल्या चार जिल्ह्यांमधील काँग्रेसची परिस्थिती अशी आहे.

 

खुद्द काँग्रेसचे नगर जिल्ह्याचे सर्वेसर्वा असणाऱ्या विखे कुटुंबियांतील जाणत्या सदस्यानं मुख्यमंत्र्यांच्या सभेत सांगितलीय. जळगाव, धुळे, नंदूरबार आणि नाशिकमधील या विदारक परिस्थितीचं चित्रण रोहिदास पाटील आणि बाळासाहेब थोरात यांनीही केलं. तसंच उत्तर महाराष्ट्रात आम्हाला वालीच नाही असे सांगत स्थानिक कार्यकर्त्यांनीही खंत व्यक्त केली.

 

विरोधकांबरोबरच मित्र पक्षही काँग्रेसला संपवण्यात मागे नाहीत. असा टोमणा मारत काहींनी स्वबळावर लढण्याची भाषाही केली.  मुख्यमंत्र्यांनी मात्र संयमी पद्धतीनं भाषण करत घर सांभाळण्याचं आवाहन केलं. नाशिक जिल्ह्यातील दोनही लोकसभा मतदारसंघात काँग्रेस संपली असून जिल्हा परिषद, महापालिकेत नावापुरती काँग्रेस राहिली आहे. उत्तर महाराष्ट्रातही वेगळी परिस्थिती नसल्यानं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये काँग्रेसची बरीच दमछाक होणार आहे.

Tags: