www.24taas.com, नवी दिल्ली
शेवटी केंद्राला महाराष्ट्रातल्या विदर्भाची दया आलेली दिसतेय. विदर्भातील पाण्याची गंभीर समस्या लक्षात घेऊन केंद्र सरकारनं सिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी 500 कोटी रुपयांचं अनुदान देण्यास मंजुरी दिलीय.
पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ समितीची बैठक पार पडली. यामध्ये महाराष्ट्रातील खडकाळ परिसरात सिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला. पंचवार्षिक योजना आयोगानं या योजनेला मे 2011 मध्ये मंजुरी दिली होती. यावेळी या योजनेसाठी अंदाजे 2178.67 करोड रुपये लागणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. ही योजना वर्ष 2015 – 2016 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.