विदर्भातील शेतकऱ्यांसाठी पॅकेज बंद

विदर्भातील वाढत्या आत्महत्यांची दखल घेऊन केंद्र सरकारनं अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा या सहा जिल्ह्यांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केलं होतं. या पॅकेजअंतर्गत शेतक-यांना गेल्या सहा वर्षांपासून 50 टक्के अनुदानावर बी-बियाणं आणि खतांची खरेदी करता येत होती.

Updated: Jun 13, 2012, 11:04 AM IST

www.24taas.com, नागपूर

 

विदर्भातील वाढत्या आत्महत्यांची दखल घेऊन केंद्र सरकारनं अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा या सहा जिल्ह्यांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केलं होतं. या पॅकेजअंतर्गत शेतक-यांना गेल्या सहा वर्षांपासून 50 टक्के अनुदानावर बी-बियाणं आणि खतांची खरेदी करता येत होती. मात्र, हे पॅकेज आता बंद झालं आहे.

 

पॅकेज बंद झाल्यामुळे शेतक-यांच्या आर्थिक अडचणीत आणखीनच भर पडली आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर बी-बियाणं आणि खतांच्या किंमती अव्वाच्या सव्वा दरानं वाढतात. 50 टक्के अनुदानामुळे शेतक-यांसाठी तो एक दिलासा ठरत होता.

 

मात्र यंदा याबात केंद्र किंवा राज्य सरकारतर्फे अनुदानाबाबत कुठलीही सूचना न आल्याने अनुदान मिळणार नसल्याचं कृषी विभागातर्फे सांगण्यात आलंय. तर व्यापा-यांकडून, दलालांकडून आता आणखीनच पिळवणूक होईल, असा संताप शेतक-यांनी व्यक्त केलाय.