माकडाचा पाठलाग बिबट्याच्या जीवावर

माकडाची शिकार करण्यासाठी त्याचा पाठलाग करणाऱ्या बिबट्याला त्याचा प्रयत्न महागात पडला आहे. भरधाव रेल्वेची धडक लागल्याने बिबट्या गंभीर जखमी झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही रेल्वेस्थानकाजवळ घडली.

Updated: Mar 1, 2012, 08:35 AM IST

www.24taas.com , आशिष आम्बाडे , चंद्रपूर

माकडाची शिकार करण्यासाठी त्याचा पाठलाग करणाऱ्या बिबट्याला त्याचा प्रयत्न महागात पडला आहे. भरधाव रेल्वेची  धडक लागल्याने बिबट्या गंभीर जखमी झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही रेल्वेस्थानकाजवळ घडली.

रेल्वे ट्रॅकच्या शेजारी जखमी अवस्थेत पडलेल्या बिबट्याला अपघात झाला. माकडाचा पाठलाग करताना बिबट्या आणि माकड दोघेही रेल्वे ट्रॅकवर आले. आणि गोंदियाहून चंद्रपूरला येणाऱ्या ट्रेनची या दोघांनाही धडक बसली. त्यात माकडाचा मृत्यू झाला आणि बिबट्या गंभीर जखमी झाला. सिंदेवाहीपासून दोन किलोमीटरच्या अंतरावर ही घटना घडली.

रेल्वेच्या चालकानं या अपघाताची माहिती वनविभागाला कळवली मात्र जखमी बिबट्यावर उपचार करण्यासाठी त्यांच्याकडे तज्ज्ञ डॉक्टरचं नव्हते. वनविभागातल्याच एका कर्मचाऱ्यानं बिबट्याला गुंगीचं औषध देवून वनविभागाच्या नर्सरीत नेलं.

सध्या हा बिबट्या उपचारासाठी नागपुरातील महाराजाबाग पशु सर्वोपचार रुग्णालयात आहे. मात्र अशा आणीबाणीच्या प्रसंगी वन विभागाजवळ साधे डॉक्टर्सही उपलब्ध होऊ शकत नसल्याची खळबळजनक बाब यातून स्पष्ट झाली आहे.