महापालिका-महावितरण...'भांडा सौख्य भरे'

अकोल्यात महावितरण आणि महापालिकेतला वाद चांगलाच रंगला आहे. वीजबिल थकवल्यामुळे महावितरणने पथदिव्यांची बत्ती गुल केली. त्यानंतर महापालिकेनंही थकबाकीच्या कारणावरुन महावितरणचं ऑफिस सील केलं आहे.

Updated: Apr 1, 2012, 09:55 PM IST

www.24taas.com, अकोला

 

अकोल्यात महावितरण आणि महापालिकेतला वाद चांगलाच रंगला आहे. वीजबिल थकवल्यामुळे महावितरणने पथदिव्यांची बत्ती गुल केली. त्यानंतर महापालिकेनंही थकबाकीच्या कारणावरुन महावितरणचं ऑफिस सील केलं आहे. गेल्या सहा दिवसांपासून अकोला शहरातले स्ट्रीट लाईट बंद आहेत. वीसहून अधिक रस्त्यांवरील बत्ती गुल झाली आहे. अकोला महापालिकेनं महावितरणच्या पथदिव्यांच्या वीजबिलाची ९५ लाख थकवल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

 

यानंतर महापालिका आणि महावितरणमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरु झालं आहे. वीज कापल्यानंतर महापालिकेने आता महावितरणच्या अमरावती विभागाच्या मुख्य अभियंता चंद्रशेखर येरम यांचं ऑफिस सील केलं आहे. ऑफिसवर सहा लाखांची थकबाकी असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलं आहे.

 

कोणतीही नोटीस न देता आकसापोटी ही कारवाई करण्यात आल्याचं महावितरणनं म्हटलं आहे. दुसरीकडे या वादात दोन्ही बाजूंनी सामंजस्याने मार्ग काढावा अशी अपेक्षा अकोलेकरांनी व्यक्त केली आहे. महापालिका आणि महावितरणच्या वादात सामान्य अकोलेकर मात्र मेटाकुटीला आले आहेत.