www.24taas.com, यवतमाळ
आत्महत्यांपेक्षा सर्पदंशामुळे शेतकरी दगावण्याचं प्रमाण अधिक आहे. सर्पदंशामुळे शेतकरी दगावण्याचं प्रमाण जास्त असलं, तरी त्यासाठी कुठलीही शासनस्तरावर दखल घेतली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वत:च्या रक्षणासाठी काही ठोस पावलं उचलणं आवश्यक आहे.
सध्या खरिप हंगाम सुरु झालाय. पावसाळ्याच्या या दिवसांमध्ये शेतात मशागतीची काम सुरु असून शेतकरी, शेतमजूरांना साप, विंचू, इंगळी आदींचा दंश होण्याची शक्यता असते. पिकांमध्ये वाढलेले तण, धुऱ्यावरील झाडं-झुडपं, कचऱ्याचे ढीग अथवा शेतातील झोपडीतले साहित्य इत्यादी ठिकाणी ओलावा शोधून साप वास्तव्य करतात. त्यामुळे शेतात किंवा अडगळीच्या ठिकाणी सर्पदंश होतो. रुग्ण घाबरुन जातो आणि अशावेळी घाई गरबडीत लगेच उपचार होण्याच्यादृष्टीनं रुग्णाला आजही अधिकतर तांत्रिकाकडे नेलं जातं. प्रसंगी वेळ वाया गेल्याने किंवा अघोरी उपचारामुळे रुग्ण दगावतात.
अनेकवेळी शेतकरी सापाला मारतात मात्र ९० टक्के साप हे विषारी नसतात. शेतकऱ्यांचं अज्ञान आणि भीतीमुळे आजही बरेच शेतकरी भीतीनेचं दगावतात. सर्पदंश टाळण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाय हाती घेतले तर सर्पदंश कमी होण्यास नक्कीच मदत होईल. त्यामुळे सर्पमित्र, अम्बुलन्स सेवा, सरकारी किंवा खाजगी डॉक्टरांचे फोन नंबर स्वत:जवळ बाळगणं आवश्यक आहे.
सर्पदंश हा माणसाच्या निष्काळजीपणामुळे होणाऱ्या मानवी मृत्यूचं प्रमाण अधिक असल्यानं नुकसान भरपाईसाठी प्रचंड निधी लागणार असून एवढा निधी अर्थखात्याकडे उपलब्ध नसल्यानं वन्यजीव मंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव काही मिनिटांतच गुंडाळण्यात आला. सराकार दरबारी शेतकऱ्यांना आणि होणाऱ्या अपघातांना मदत मिळत नसली तरी स्वत:च्या रक्षणासाठी शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यायलाच हवी.
व्हिडिओ पाहा :
[jwplayer mediaid="145336"]
.
.