झी २४ तास वेब टीम, नागपूर
इंदू मिल प्रकरणी विधानसभेत फलक दाखवून गदारोळ केल्यानं सत्तारुढ आघाडीच्या पाच आमदारांवर एक दिवसाच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे तीन आणि काँग्रेसचे दोन अशा पाच आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे.
जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे तर चंद्रकांत हंडोरे आणि प्रशांत ठाकूर या दोन काँग्रेसच्या आमदारांना निलंबित करण्यात आल आहे. इंदू मिलची सर्व जमीन तातडीनं स्मारकाला द्यावी अशी मागणी या आमदारांनी केली आहे. तसचं विधिमंडळातच तशा प्रकारचा ठराव आणावा आणि तो एकमुखानं संमत करावा अशी मागणीही या निलंबित आमदारांनी केली आहे.
इंदू मिलप्रश्नी सभागृहात फलक आणल्याप्रकरणी संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ही कारवाई केली. त्यामुळे आजचं कामकाज संपेपर्यंत या पाचही जणांना कामकाजात सहभागी होता येणार नाही.