अकोल्यात मुख्यमंत्र्यांची गाडी रोखली

अकोल्यात आज मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कृषी विद्यापीठांच्या संयुक्त संशोधन परिषदेच्या समारोपाला आले होते.

Updated: May 31, 2012, 12:41 PM IST

www.24taas.com, अकोला

 

अकोल्यात  आज  मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कृषी विद्यापीठांच्या संयुक्त संशोधन परिषदेच्या समारोपाला आले होते.

 

मुख्यमंत्री विमानतळावरून विद्यापीठाकडे जात असतांना नवीन बायपास मार्गाजवळ भाजप कार्यकर्त्यांनी ताफा अडविण्याचा प्रयत्न केलाय. मात्र पोलिसांच्या सतर्कतेने भाजप कार्यकर्त्यांचा ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आलाय. दरम्यान ताफा अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पन्नासवर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात  घेतले.

 

देशभरात पेट्रोलच्या दरवाढीवर विरोधी पक्षांनी भारत बंदच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज अकोल्यातील कृषी विद्यापीठात एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आले होते. गेल्या तीन दिवसांपासून अकोला कृषी विद्यापीठात राज्यातील चारही कृषी विद्यापीठांची संयुक्त संशोधन परिषद सुरु आहे.

 

भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी ताफ्यात घुसण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील फलक फडकावीत त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्याय. देशतील पेट्रोल दरवाढ, महागाई, राज्यातील दुष्काळ आणि राज्य सरकारचे अकोल्याच्या विकासाकडे होत असलेले दुर्लक्ष या मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी हा प्रयत्न केल्याचे बोलले जातेय. मात्र पोलिसांच्या सतर्कतेने भाजप कार्यकर्त्यांचा ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला.