सोफ्यात सापडले ५४ कोटीचे ड्रग

उरणमधील खोपटा येते ५४ कोटी रुपयांचे रेफड्रग भागात जप्त करण्यात आले.रेव्ह पार्टीसाठी वापरले जाणारे ड्रग्स यात सापडले आहेत (डी. आर. आय.) विभागाच्या अधिकार्‍यांनी ही कारवाई केली.

Updated: Nov 18, 2011, 04:47 AM IST

झी २४ तास वेब टीम, उरण

 

उरणमधील खोपटा येते ५४ कोटी रुपयांचे रेफड्रग भागात जप्त करण्यात आले.रेव्ह पार्टीसाठी वापरले जाणारे ड्रग्स यात सापडले आहेत (डी. आर. आय.) विभागाच्या अधिकार्‍यांनी ही कारवाई केली. खोपटा येथील काँटीनेंटल वेअरहाऊसिंग गोदामात उतरलेल्या आणि व्हिएतनामासाठी निर्यात होणार्‍या एका सोफा सेटमध्ये हे १६८ किलोड्रग सापडले. उरण येथे ही धाड टाकली तरीसुद्धा न्हावा शेवाच्या डी आर आय कार्यालयाला मात्र याची कुठलीही माहिती नव्हती.

 

या वेअरहाऊसिंग गोदामाच्या शेड नंबर तीनमध्ये आज गुरुवारी दुपारी १ वाजल्यापासुन डी आर आय च्या मुंबई युनिटचे अधिकारी कसून तपासणी करीत होते. गोदामातील कामगारांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेड नंबर तीनमध्ये ठेवलेले सोफासेट फाडून त्यातुन पांढर्‍या रंगाच्या पावडरच्या पिशव्या काढल्या जात होत्या. इंटरनॅशनल शिपिंग कंपनी या मालाची सीएचए होती तर माल आर्शिया इंटरनॅशनल मार्फत व्हीएतनामला पाठविला जाणार होता. मालाच्या निर्यातदार पार्टीचे डीआयबीआय असे नाव समोर आले आहे.

 
यावर्षी फेब्रुवारी २0११पासून कॅटामाईन हायड्रोक्लोराईडला केंद्र शासनाने अंमलीपदार्थांच्या यादीत सहभागी केले आहे. त्यामुळे खोपट्यात सापडलेल्या साठय़ाप्रकरणी डीआरआय एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करू शकेल.