राजापूरची गंगा आली हो...

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरची गंगा प्रकट झाल्याने भाविकांची गर्दी होवू लागली आहे. दर तीन वर्षांच्या अंतराने प्रकटणारी गंगा यावेळी अवघ्या दहा महिन्यातच पुन्हा आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दरम्यान भूगर्भातील हालचालीमुळे ही गंगा प्रकट झाल्याचे सांगण्यात येत आहे. काल (दि.११ एप्रिल) ला इंडोनेशियात ८.९ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपामुळे ही गंगा अवतल्याचे काहींचे म्हणणे आहे.

Updated: Apr 13, 2012, 08:21 AM IST

www.24taas.com, रत्नागिरी

 

 

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरची गंगा प्रकट झाल्याने भाविकांची गर्दी होवू लागली आहे.  दर तीन वर्षांच्या अंतराने प्रकटणारी गंगा यावेळी अवघ्या दहा महिन्यातच पुन्हा आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

 

 

दरम्यान भूगर्भातील हालचालीमुळे ही गंगा प्रकट झाल्याचे सांगण्यात येत आहे. काल (दि.११ एप्रिल) ला इंडोनेशियात ८.९ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपामुळे ही गंगा अवतल्याचे काहींचे म्हणणे आहे.

 

 

 

इंडोनेशियातील भूकंपानंतर  राजापूर येथील गंगा कुंडात पाणी दिसू लागले.  त्यानंतर काही मिनिटांतच गंगा कुंडे पाण्याने भरू लागली. एका पाठोपाठ एक अशी १४ कुंडे पाण्याने भरली आणि गोमुखातून गंगेचा प्रवाह सुरु झाला. गंगेचा आतापर्यंतचा सव्वाशे वर्षांचा इतिहास उपलब्ध आहे.  गंगा दर तीन वर्षांनी प्रकटते अशी भाविकांची वर्षानुवर्षांची श्रद्धा आहे.

 

 

 

यापूर्वी १९१८ ते १९३६ या अठरा वर्षांच्या काळात गंगा प्रकट झाली नव्हती. गतवर्षी गंगा फेब्रुवारी महिन्यात अवतरली होती. या पूर्वीचा गंगेचा वास्तव्याचा सर्वाधिक काळ १०५ दिवसांचा  होता. गतवर्षी  उच्चांक नोंदवत  ११५ दिवस गंगा होती. राजापुरात प्रथमच  गंगा दहा महिन्यात प्रगटली आहे.  गंगेच्या   परिसरातील गावात पाण्याची टंचाई असताना गंगेच्या गोमुखातून वाहत असून सगळीच कुंड पाण्याने भरून गेली आहेत.

 

 

यापूर्वी  गुजरातमध्ये २६ जानेवारीला झालेल्या भूकंपाच्या दिवशीच गंगेचं आगमन झाल होतं तर २००५च्या भूकंपानंतरही गंगेचं आगमन झाल होते. त्यामुळे  इंडोनेशियातील भूकंपानंतर ही गंगा प्रकटल्याने याचा संबंध  भूकंपाशी जोडला जात आहे. मात्र, भाविकांची श्रद्धा असल्याने  राजापूरच्या गंगास्थानी धाव घेतली आहे.

 

 

 

व्हिडिओ पाहा...

 

[jwplayer mediaid="82011"]

 

फोटो पाहा...